Sunday 12 January 2014

'पालकांची राजकीय जबाबदारी...!'

आज देशात जी राजकीय क्रांती घडतेय त्याचे आपण सर्व साक्षीदार आहोत. ज्याप्रकारे सामान्य नागरिक देशात पसरलेल्या अराजकतेविरुद्ध आज जागा झाला आहे, असं चित्र स्वातंत्र्योत्तर भारतात कधीच दिसलं नव्हत. लोकांमध्ये एक नवी उमेद निर्माण झाली आहे. त्याचं सगळ्यात मोठं  कारण म्हणजे आजचा युवा वर्ग. दिल्लीत जे काही घडलं, त्याची पुनरावृत्ती  आगामी निवडणूकीत करण्यास आता संपूर्ण देश सज्ज झालेला आहे. पण माझा प्रश्न हा कि, आपल्या समाजाचा प्रत्येक घटक ह्या राजकीय क्रांतीचा भाग बनायची इच्छा मनात ठेवतोय का? आणि नाही! तर का नाही?

नाण्याची दुसरी बाजू अशी कि अर्ध्याहूनही जास्त तरुणवर्गाने आजही स्वतःला राजकारणापासून दूर ठेवले आहे. ह्याचा सखोल विचार केला असता असे लक्षात येते कि आजचा पालक वर्ग आपल्या पाल्याला राजकारणात  सक्रिय भाग घेण्यास प्रोत्साहित करत नाही. 

आजची तरुणाई fantacy world मधेच राहणं जास्ती पसंत करते. मित्र - मैत्रिणी, social networking,video games, whatsapp, facebook, movies, serials, कॉमेडी shows, photos ह्यातच त्याचं जग हरवलय. अगदी १२ - १४ वर्षाच्या पोरालाही काही अक्कल नसली तरी girlfriend पाहिजे हे नेमक कळतं! सुसाट गाड्या उडवण्यात, मुलींची छेड काढण्यात, महागडे electronic gadgets flaunt करण्यात आजची तरुणाई दंग झालेली दिसते. परीक्षा आली कि थोडाफार अभ्यास करून पास होणं ह्यातच ह्यांची हुशारी! आणि राजकारणाचा कुणी विषय काढलाच तर त्याची फक्त थट्टामस्करी.

कुण्या तरुणीचा विनयभंग, भ्रष्टाचाराचे माजलेले स्तोम, पेट्रोल व अगदी जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले भाव बघितले कि हा तरुण काही वेळ जागा होतो. जास्ती काही नाही तर किमान आपल्या Facebook, twitter वर तो राग व्यक्त करू लागतो. काही जण पुढे येउन आंदोलनात भाग वगैरे घेतात. काहींच्या वादविवादाच्या मैफिली सजतात. फारच झाल तर एखाद्या वेळी पोलिसांचा ससेमिराही सोसावा लागतो. पण 'रात गयी बात गयी' च्या ह्या दुनियेत दोन दिवसांनी पुन्हा सारे शांतच..! जैसे थे! Back  To Routine! 'इतकी घाईये हो. वेळ कुणाला आहे?' after all it's a fast life. 

आपलं कुठे चुकतं माहितिये का? आपण adjustment ची सवय करून घेतली आहे. खराब रस्ते, अपुऱ्या आरोग्याच्या सोयी, निकृष्ट दर्जाचं शिक्षण, 'ये सब चलता है '! पण ह्यात बदल? त्यासाठी कोणीच सामील होण्यास धजत नाही कारण लहानपणापासून त्यांना तसे शिकवलेच जात नाही. ना शाळेत, ना कॉलेजात, ना घरात. याउलट राजकारण ही एक दलदल आहे, 'आपल्यासारखा सामान्य आणि मध्यमवर्गीय माणूस काय करून घेणार ?' एवढं म्हणून आपण आपल्या जबाबदारीपासून पळून जातो. भ्रष्ट राजकारण्यांना हेच तर हव असतं. 

मुलींची परिस्थिती तर त्याहूनही बिकट. त्यांच्या मनात तर राजकारणाबद्दल विचार चुकूनही येत नाहीत. त्यांना त्यांच्या मतदार संघाचे नगरसेवक, आमदार, खासदाराचे नावही माहिती नसते. 

तरुणाईचा सारा वेळ आणि energy फक्त 'मी mod', 'मी trendy', 'मी cool' हेच सिद्ध करण्यात जातोय. राजकारण, समाजकारणाचा दूरदूर पर्यंत त्यांना मागमूसही नाही. एकूणच system कडे पूर्णतः पाठ फिरवली आहे ह्या तरुणाईने. कुणालाच अवघड आयुष्य जगायचं नाहीये. फक्त स्वतःपुरताच विचार करण्यात सारेच मग्न आहेत. राष्ट्रप्रेमाची भावना हरवत जातेय. आजच्या युवकाला रस्त्यावर romance करताना लाज वाटत नाही पण देशप्रेम, राष्ट्र भक्तीची  भावना व्यक्त करताना लाज वाटते. बहुतांश युवक शिक्षण घेऊन विदेशात जाऊन वसण्याचे मार्ग शोधताहेत. असा कसा  बनणार भारत एक superpower . . ?

ह्या सगळ्या गोष्टी करायला हरकत नाही पण हे सारं करताना राष्ट्रप्रेम आणि समाजाप्रती आपली जबाबदारी समजली तर अधिक चांगल नाही का? 

त्यासाठी आजच्या पालकांनी आपली राजकीय जबाबदारी समजून घेणं फार महत्वाचं आहे 

आजकाल…. खरतर, नेहमीच पालक आपल्या पाल्यांना commodity समजतात आणि त्यांना स्वतःचा Status Symbol बनवण्यासाठी धडपडताना दिसतात. चांगल शिक्षण घे, खूप अभ्यास कर, मोठा हो, परदेशात जा, लट्ठ पगाराची नोकरी कर आणि settle हो! बास…! प्रत्येक पालक आपल्या पाल्याला फक्त आणि फक्त settle करू पाहतोय. पण ह्या धडपडीत आपण हे विसरतोय कि स्वतःला settle करण्याच्या ह्या घाईत देशाची ढासळती परिस्थिती कोण settle करणार?

आपल्या देशाच्या राजकारणात घराणेशाही आणि गुंडगिरी वाढते आहे. का? कारण राजकारणापासून दूर असलेला वर्ग त्याकडे जातच नाहीये. पालक त्यांच्या पाल्यांना राजकारणात सहभागी होण्यास प्रोत्साहित करतांना दिसत नाहीत. 

पालक मुलांना डोळ्यावर पट्टी बांधून अगर पारंपरिक झापडं लावून जगणं  शिकवत आहेत. 'तुम्हाला आपला देश अधिक प्रगतीपथावर आलेला आवडणार नाही का?' हा प्रश्न पालकांनी स्वतःला विचारण्याची अत्यंत आवश्यकता आहे. भारताचे सुजाण नागरिक म्हणून आपण आपली जबाबदारी आणि कर्तव्ये समजून घेण्याची गरज आहे. आपल्या पाल्यामध्ये जमेल त्या पद्धतीने राजकारण आणि समाजकारणाची आवड निर्माण करण्याची गरज आहे. सभोवतालचे राजकारण, समाजकारण आपल्या पाल्याला समजावे, सध्याच्या बिघडत्या परिस्थितीची त्यांना जाणीव व्हावी ह्यासाठी  दिवसातल्या २४ तासांमधले किमान १५ minute तरी ह्या विषयांवर आपण त्यांच्याशी चर्चा करावी. त्यांना दररोज वर्तमानपत्र वाचण्यास, बातम्या बघण्यास प्रोत्साहित करावे. ह्याद्वारे आपण आजच्या पिढीला विचार करायला प्रवृत्त करू शकतो. त्यातूनच त्यांच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण होतील आणि पुढे जाऊन ह्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा ते प्रयत्न करतील. 

राजकारण चुकीचे नाही तर त्यातील काही लोक आणि त्यांचे स्वार्थी विचार चुकीचे आहेत हे आपल्याला आजच्या तरुणांना पटवून द्यायचे आहे. भारतातले राजकीय पुढारी कोण? त्यांचे पक्ष कोणते? त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय? हे आपले नेते होण्यास सक्षम आहेत काय? ह्या आणि अशा प्रश्नांवर विचार करण्यास त्यांना प्रवृत्त केले पाहिजे. तरुणांच्या एकूणच राजकीय विचारांना प्रगल्भ केले पहिजे. निष्पक्ष होऊन पाल्यांना स्थानिक ते राष्ट्रीय राजकारण समजावून दिले पाहिजे. आपण पारंपारिकरित्या 'त्याच' पक्षाचे समर्थक आहोत म्हणून तू पण 'त्याच' पक्षाचा समर्थक हो, त्यांच्यावर असा कोणत्याही प्रकारचा वैचारिक दबाव न आणता,  त्यांना स्वतःचा राजकीय मतप्रवाह निवडण्यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे. 

हा उमेदवार आपल्या जातीचा अगर धर्माचा नाही म्हणून तो योग्य नाही अशा प्रकारचे विचार आपण त्यांच्यावर लादता कामा नये. धर्माच्या, जातीच्या, ओळखीच्या किवा आर्थिक परिस्थितीच्या आधारे एखादी व्यक्ती चांगली अगर वाईट असे न ठरवता, व्यक्तीची शैक्षणिक पात्रता, विचार, कार्यपद्धती ह्यांसारखे निकष लावून योग्य उमेदवार निवडण्याचे बाळकडू त्यांना दिले गेले पाहिजे.

आपल्या देशात पूर्वी जितक्या प्रभावशाली महिला राजकारणी होऊन गेल्या तितकीच सध्या महिलांची राजकारणात वाणवा आहे. आजही खूप सारा  महिला वर्ग सक्रिय राजकारणापासून दूर आहे. महिलांमध्ये असामान्य क्षमता, प्रचंड संयम व उत्तम नेतृत्त्वगुण असतात आणि त्यामुळे त्या उत्तम राजकारणी होऊ शकतात, गरज आहे त्यांना स्वाभिमानी आणि स्वावलंबी बनवण्याची, स्वतःच्या हक्कासाठी लढणं शिकवण्याची . 

एक युवा वर्ग असा आहे जो राजकारणाकडे self motivated आहे पण त्यांची खंत अशी कि, पालक त्यांना विरोध करतात. याउलट त्यांना पालकांनी  योग्य मार्गदर्शन व त्यांच्या कार्यात प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

याप्रकारे पालकांनी आपली जबाबदारी समजून पुढची पिढी घडवल्यास देशात नक्कीच राजकिय क्रांती घडून येईल. येणाऱ्या पिढीत देशप्रेमाची, योग्य-अयोग्य ह्याची जाणीव असेल आणि  पालकांच्या ह्या पावलामुळे आजचा हा भरकटलेला किशोर उद्याचा एक सुजाण भारतीय नागरिक होईल. 
आणि मग तो दिवस दूर नाही जेव्हा देशात एक चांगले सरकार येईल आणि भारत एक जागतिक महासत्ता बनेल !

रिषी श्या. भुतडा 
प्रथम वर्ष, M.TECH, 
संगणक अभियांत्रिकी, 
V. J. T. I., माटुंगा , मुंबई 

14 comments:

  1. Baap! Ekch number!
    Well put wit solutions!

    ReplyDelete
  2. उत्कृष्ट!!!!

    ReplyDelete
  3. Bhai!!! Superlike!!! Zabardassstt!!!

    ReplyDelete
  4. Bravo Rishi...!!! Khup Chhan ani exact Lihilayes....!!!

    ReplyDelete
  5. Superbo fanatbulous job buddy...

    great thaughts comes from great mind.

    ReplyDelete
  6. khup khup masst!!!!!! Kharch baryach yuva vargala hi gosht lagu padte. Agadi yogya gosht atishay "Simple" shabdat mandalis.....Masstch.....Keep it up!!!!!

    ReplyDelete
  7. dada tum to chhagaye yr....



    mast yr....

    ReplyDelete